टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महीला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करणार- ना.राधाकृष्ण विखे पाटील
टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महीला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करणार- ना.राधाकृष्ण विखे पाटील
टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महीला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करणार- ना.राधाकृष्ण विखे पाटील
राहाता विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२५– औद्योगिकी करणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, कौशल्य प्रशिक्षणाची मोठी संधी निर्माण करण्यात येत आहे. टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महीला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जळगाव येथे सुमारे १ कोटी १३ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभांरभ तसेच रोकडोबा महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करती आहे. आर्थिकदृष्ट्या देशाची वाटचाल पाहाता येणारे सर्व उद्योग आणि यातून निर्माण होणारे रोजगार मोठ्य संधी निर्माण करुन देणा-या आहेत.

विकास प्रक्रीयेचा निर्णय करताना केंद्र आणि राज्य सरकारने महिलांना अधिक प्राधान्य दिले असून, ड्रोणदिदी निर्माण करण्यात प्रोत्साहन दिले आहे. कृषि क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापर ड्रोण तंत्रज्ञानाचा केला जात असून, या माध्यमातून बचत गटांना रोजगार निर्मितीमध्ये मोठा फायदा होत आहे. आपल्या तालुक्यातील महिला बचत गटांच्या चळवळीचे काम प्रभावीपणे सुरु असून, या महिलांना अधिक पाठबळ दिल्यास बचत गटांच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीचे उद्योग तयार होवू शकतात. यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी यासाठी आटापिटा केला. आता आरोग्य सुविधांच्या बाबतीत सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले असून, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत २४०० आजारांचा समावेश करुन, ५ लाख रुपयांचे सुरक्षा कवच या योजनेतून देवू केले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल मंत्री म्हणून काम करताना शेती महामंडळाच्या जमीनी शेतक-यांच्या नावावर विनामुल्य करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण केला. शेतक-यांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही. या जमीनींवर घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांची कामे सुरुच आहेत, मात्र ज्या ठिकाणी अडचयणी आहेत त्याभागामध्ये चा-यांची कामे पुर्ण करुन, पाण्याची वहन क्षमता अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचे नियोजन केले आहे. यापुर्वी बंद पडलेला गणेश कारखाना सहकारी तत्वानेच चालवून तो शेतक-यांच्या मालकीचा कसा राहील यासाठी यशस्वी प्रयत्न केला. बंद पडलेले निळवंडे कालव्यांचे काम पुर्णत्वास नेवून जिरायती भागाला पाणी आणून दाखविले. त्यामुळे बंद पडलेली सर्व कामे सुरु करण्याचे काम आम्हीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



