सलग ४६ वेळा रक्तदान आयोजित करणाऱ्या मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – विवेकभैय्या कोल्हे
सलग ४६ वेळा रक्तदान आयोजित करणाऱ्या मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – विवेकभैय्या कोल्हे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ६ जानेवारी २०२४— कोपरगावातील मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील मित्र फाउंडेशनच्या ४६ व्या भव्य रक्तदान शिबीर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सदस्य व नेहमीच सामाजिक कार्यात आसलेल्या मित्र फाउंडेशनचे २००१ पासून सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिर आज देखील सुरू असून आज मित्र फाऊंडेशनच्या वतीने ४६ वे रक्तदान शिबीर भरवले होते यात २५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जाहिरात
यावेळी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी सहभाग घेतला होता महत्त्वाचे म्हणजे महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने रक्तदानात सहभाग नोंदवला.यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, संजीवनी शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, अजितशेठ शिंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे, कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष साहेबराव रोहम, माजी सभापती सुनील देवकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचीन तांबे, दर्शनशेठ काले, प्रसिध्द जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल, भाजपा शहर अध्यक्ष दत्ता काले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गंगुले, विकास आढाव,,बाळासाहेब आढाव, सुनील फंड, माजी नगरसेवक मंदार पहाडे, मुकुंदशेठ भुतडा, राजेंद्रे वाकचौरे,फकीरराव बोरणारे दौलत वाईकर, संदिप जाधव , माजी नगरसेवक विरेंद्र बोरावके, भाजपा दिव्यांग सेलचे मुकुंदमामा काळे, आकबर शेख, अंकुश वाघ, रोहित वाघ, दिपक वाजे,पत्रकार फकिरराव टेके, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आविनाश पाठक, सागर शाह, सागर जाधव, राहुल सूर्यवंशी, शिवसेनेचे माजी शहरध्यक्ष कलविंदर दडीयाल, शेखर कोलते, रवी कथले, विकी जोशी संतोष होण, अनुप कातकडे, प्रशांत होण सहमित्र फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक ८८ वेळा राजतदान करणारे निरव रवालिया व ५५ वेळा रक्तदान करणारे प्रदीप निकुंभ आदींसह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते ते ४६ वे रक्तदान शिबिर सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्याबद्दक मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी आभार मानले.