आपला जिल्हा

“नानांशी केवळ परिचय नव्हता, तर मैत्रीचे घनिष्ठ ऋणानुबंध होते” — ना. विखे पाटील

 “नानांशी केवळ परिचय नव्हता, तर मैत्रीचे घनिष्ठ ऋणानुबंध होते” — ना. विखे पाटील

 “नानांशी केवळ परिचय नव्हता, तर मैत्रीचे घनिष्ठ ऋणानुबंध होते” — ना. विखे पाटील

Loni vijay kapse दि ८ ऑक्टोबर २०२६– आपल्या विलक्षण अभिनय सामर्थ्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनाला तीव्र वेदना झाल्या. आपल्या कसदार अभिनयातून असंख्य व्यक्तिरेखांना जिवंत करणारा आणि अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक प्रतिभावंत कलावंत आणि शेतकऱ्यांप्रती संवेदना असणारा दिलखुलास मित्र आज आपल्यातून निघून गेला आहे,” अशी भावना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

जाहिरात

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, “नानांचा अभिनय म्हणजे सहजता, वास्तववाद आणि प्रभावी अभिव्यक्तीचा अनोखा संगम होता. त्यांच्या भारदस्त आवाजाने, वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीने आणि भूमिकेशी एकरूप होण्याच्या विलक्षण शैलीने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी उंची मिळवून दिली. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आणि संवाद पुढील कित्येक पिढ्यांच्या स्मरणात राहतील. मराठी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत केलेल्या अनेक भूमिकांमधून नानांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. ‘नटसम्राट’ असो की ‘क्रांतीवीर’, नानांच्या अभिनयाची छबी रसिकांच्या डोळ्यांसमोरून कधीही दूर होणार नाही.”

जाहिरात

“नानांशी माझा केवळ परिचय नव्हता, तर अतिशय आपुलकीचे आणि मैत्रीचे ऋणानुबंध होते. त्यांच्याशी झालेल्या गप्पा, विविध विषयांवरील मनमोकळा संवाद आणि त्यांच्या सहवासातील क्षण आजही आठवणीत ताजे आहेत. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कृषी आणि जलक्षेत्रामध्ये केलेल्या कामाप्रती त्यांना नितांत आदर होता, त्या दोघांचीही घनिष्ठ मैत्री होती. वेळोवेळी त्यांच्या कामाची आठवण नाना पाटेकर यांनी बोलून दाखविली. मनात असेल ते स्पष्टपणे बोलणारा, कोणताही दिखाऊपणा न करता माणुसकी जपणारा आणि सामाजिक प्रश्नांबद्दल तळमळ बाळगणारा हा माणूस मला नेहमीच भावला.”

जाहिरात

“काही दिवसांपूर्वीच नानांची भेट झाली होती आणि आमचा दिलखुलास संवाद झाला. राज्यात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची तसेच दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये स्वतःहून योगदान देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. कलाक्षेत्रातील उत्तुंग यशाबरोबरच नानांनी समाजसेवेचाही तितक्याच निष्ठेने ध्यास घेतला. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाची कामे असोत किंवा संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलेला मदतीचा हात असो, त्यांच्या कार्यातून सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती सातत्याने आली. प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या वेदनांशी एकरूप होणारा हा कलावंत खऱ्या अर्थाने माणुसकीचा चेहरा होता.”

“नानांच्या निधनाने भारतीय कलाविश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे. त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान, समाजासाठी केलेले कार्य आणि आमच्यातील स्नेहबंधांच्या आठवणी कायम हृदयात जपल्या जातील. नानांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे