आपला जिल्हा

कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव कडून विशेष वसुली मोहीम

कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव कडून विशेष वसुली मोहीम
कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव कडून विशेष वसुली मोहीम
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ११ मार्च २०२५कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सुमारे १७८८१ मालमत्ता धारक असून त्यातील सुमारे १४४८३ निवासी व ३३९७ बिगरनिवासी आणि मिश्र मालमत्ता आहेत तसेच सुमारे १४८३२ नळ जोडणी धारक आहेत. या सर्वाना महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० नुसार सन २०२४-२५ अखेरची कराची बिले बजावण्यात आलेली आहेत. कोपरगाव नगरपरिषदची मालमत्ताकराची एकूण मागणी ९९१.६१ लक्ष रुपये असून त्यापैकी ९ मार्च २०२५ अखेर ४२७.५७ लक्ष रुपये म्हणजे (४३.११%) वसूल झालेली आहेत. तसेच पाणीपट्टी ची एकूण मागणी ५९६.४६ लक्ष रुपये असून त्यापैकी ९ मार्च २०२५ अखेर १९७.३६ लक्ष रुपये म्हणजेच (३३.०९%) वसूल झालेली आहेत.

जाहिरात
मे. महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार सुमारे ८०% पेक्षा जास्त मालमत्ता कर व पाणीपट्टी ची वसुली अनिवार्य केलेली आहे. त्यामानाने कोपरगाव नगरपरिषदेची वसुली अत्यल्प आहे त्यामुळे नगरपरिषदेने सर्व कार्यालयीन अधिकारी व वसुली कर्मचारी ८ वसुली पथक तयार केले असून त्याना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे तरतुदीनुसार थकबाकी धारकावर कार्यवाही करणेचे आदेशित करणेत आलेले आहे.

जाहिरात
या आदेशानुसार वसुली पथकाद्वारे शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीधारकावर कार्यवाही सुरु करणेत आलेली आहे. दिनांक ९ मार्च २०२५ अखेर ११७ नळ जोडणी खंडित करण्यात आलेली आहे, त्याच प्रमाणे शहरातील थकीत मालमत्ता धारकांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार १०९ मालमत्ता जप्ती नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत उर्वरित थकबाकी धारकांना जप्ती नोटीसा तयार करून बजावण्यात येणार आहेत. जप्ती नोटीसा बजावलेल्या मालमत्ताधारकानी विहित मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास त्याचे मालमत्तेवर बोजा चढविणेत येणार आहे व त्यानंतर जप्ती करून जप्त केलेल्या जागा किंवा वस्तू यांचा लिलाव करून कर वसुली करणेत येणार आहे. तसेच नळ जोडणी खंडित करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे थकीत रक्कमेवर दरमहा २% शास्ती आकारणी सुरु आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देय होत नाही.

जाहिरात
तरी ज्या मालमत्ता धारक,नळजोडणी धारक, गाळे धारक यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी,गाळा भाडे धारक यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळाभाडे अद्याप भरलेले नाही त्यांनी तात्काळ देय कर रक्कम भरून कटू कार्यवाही टाळावी व नगर परिषदेस सहकार्य करावे आणि कोपरगाव चे विकासास हातभार लावावा मालमत्ता धारक यांचे सोईसाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय वसुली विभाग दि. ३१ मार्च २०२५ अखेर सकाळी ८.३० ते साय.७.०० वाजेपर्यंत दररोज सुरु राहील याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे