आपला जिल्हा

के.बी.रोहमारे महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

के.बी.रोहमारे महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे – ऋतुजा गायकवाड

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १३ मार्च २०२६कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुजित रोहमारे यांचा अध्यक्षतेखाली व २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत ऑल इंडियात १०६ वा क्रमांक मिळवत देशातील प्रतिष्ठित सेवेत स्थान मिळवलेल्या नुकतेच संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील कु. ऋतुजा अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका यांचा ऋतुजा गायकवाड यांचा शुभहस्ते महिला दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

जाहिरात

प्रारंभी सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करत कार्यक्रमास सुरुवात झाली.आधुनिक काळात जग वेगाने पुढे जात असून त्यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे असल्याचे ऋतुजा गायकवाड यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण दादा थोरात, प्रभारी प्राचार्य रहाणे एस.पी,सामजिक कार्यकर्ते भास्कर तात्या थोरात, राज्य पत्रकार संघाचे माजी तालुका सचिव विनोद जवरे तसेच महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.साबळे एस.एस यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गोरडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रभारी प्राचार्य रहाणे सर यांनी मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे