आपला जिल्हा

१० हजाराहून अधिकच्या वस्तू मिळण्याचे द फॅमिली मार्ट या भव्य दालनाचा आज शुभारंभ

१० हजाराहून अधिकच्या वस्तू मिळण्याचे द फॅमिली मार्ट या भव्य दालनाचा आज शुभारंभ

१० हजाराहून अधिकच्या वस्तू मिळण्याचे द फॅमिली मार्ट या भव्य दालनाचा आज शुभारंभ
कोपरगाव विजय कापसे दि १ मार्च २०२६पुणे मुंबई नाशिक यासारख्या मोठमोठ्या शहरात एकाच दालनाखाली गृहपयोगी वस्तू मिळण्याचे मोठमोठे दालन आपणास पहावयास मिळत असतात याच धर्तीवर कोपरगावात देखील लोढा परिवाराच्यावतीने अत्यंत वाजवी किमतीत १० हजाराहून अधिकच्या गृहपयोगी वस्तू एकाच छताखाली मिळाव्या या उद्देशाने शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येवला रोड लगत हॉटेल आशोका समोर नव्याने सुरू केलेल्या “द फॅमिली मार्ट” या अत्यंत प्रशस्त अशा दालनाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थान बेट कोपरगावचे मठाधिपती महंत प.पु स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होत आहे.

या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, ट्रांशीन इंडियाचे सीईओ अरजित तलपात्रा, बोरा मल्टी कार्पोरेशनचे संस्थापक एमडी सीईओ प्रशांत बोरा, विवो सीएसएनचे डीजीएम प्रताप साळुंखे,शिर्डी येथील वीरसाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रतिलाल लोढा आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन द फॅमिली मार्ट चे सर्वेसर्वा सुभाषशेठ दिपचंदजी लोढा, सतीश सुभाषशेठ लोढा, आनंद सुभाषशेठ लोढा व जीवन सुभाषशेठ लोढा यांच्यासह समस्त लोढा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण तालुक्यात सर्व कंपनीचे सर्व प्रकारचे मोबाईल अत्यंत स्वस्त मिळण्याचे साईनाथ टेलिकॉम या दालनाच्या यशस्वी वाटचालीनंतर नव्याने सुरू होत असलेल्या लोढा परिवाराच्या द फॅमिली मार्ट या भव्य दालनात क्रॉकरी, हार्डवेअर, होम डेकोर, किचन वेअर, स्टेशनरी, खेळाचे साहित्य, ग्लासवेअर, मोबाईल आणि ऍक्सेसरीज, वेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट, सौंदर्यप्रसाधने, खेळण्या आदि गृहपयोगी १० हजाराहून अधिकच्या वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण कोपरगाव येथे सुरू होत आहे त्यामुळे समस्त कोपरगावकरांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे