आपला जिल्हा

करंजी ग्रामपंचायतीने एक रकमी भरले २ लाखाचे पाणीपुरवठ्याचे वीज बिल

करंजी ग्रामपंचायतीने एक रकमी भरले २ लाखाचे पाणीपुरवठ्याचे वीज बिल

करंजी ग्रामपंचायतीने एक रकमी भरले २ लाखाचे पाणीपुरवठ्याचे वीज बिल

जाहिरात कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि २२ मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या करंजी गावच्या ग्रामपंचायतीने मार्च अखेरीस महावितरण वीज कंपनीला एक रकमी तब्बल २ लाख ३ हजार रुपयांचे वीज बिल भरले आहे.

जाहिरात आत्मा

सविस्तर वृत्त असे की, करंजी गावची लोकसंख्या साधारणपणे ५ हजारच्या आसपास असून संपूर्ण गावाला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ३ विहिरी असून यातील २ विहिरीवर ७.५ एच पी ची व १ विहिरीवर ५ एच पी ची मोटार असून विहिरीवरील मोटार पंपाद्वारे संपूर्ण गावाला नियमितपणे नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो याच वीज मोटार पंपाचे २ लाख ३ हजार रुपयांच्या वीज बिलाचा धनादेश करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सुनील राजपूत आदींनी शुक्रवारी २१ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संवत्सर विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत बोंडखळ यांच्याकडे सुपूर्द केला.

जाहिरात

या प्रसंगी करंजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, सोमनाथ फापाळे,काजल भिंगारे, कावेरी भिंगारे,सुभाष चरमळ, रुपाली जाधव, नानासाहेब डोखे, शंकर आहेर, पूजा डोखे, रुक्मिणी गायकवाड तसेच वायरमन वायरमन चंद्रशेखर वाघ, कर्मचारी चेतन संवत्सरकर, मानेखा पठाण आदीसह ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी गावचे सरपंच रविंद्र आगवन यांनी बोलताना सांगितले की, गावच्या ग्रामस्थांनी वेळेच्या आदी घर पट्टी व नळपट्टी भरल्याने हे शक्य झाले असून या पुढेही गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे उपक्रम सर्वांचे मार्गदर्शनाने राबविणार असल्याचे सांगत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले.

चेक देतांना

सर्व घरगुती व्यावसायिक वीज ग्राहकांनी आपल्या कडे असलेली वीज बिलाची थकबाकी या महिना अखेरीस आपल्या जवळच्या वीज बिल केंद्रात अथवा ऑनलाइन भरून सहकार्य करावे अधिक माहिती साठी महावितरण कर्मचारी यांच्या सोबत संपर्क साधावा.

प्रशांत बोंडखळ

कनिष्ठ अभियंता

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे