बोलकी शिवारात डाव्या कालव्यात आढळले बेवारस पुरुषाचे प्रेत
बोलकी शिवारात डाव्या कालव्यात आढळले बेवारस पुरुषाचे प्रेत
तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्यातून बोलकी शिवारातुन वाहणाऱ्या गोदावरी डाव्या कालव्यातीळ पाइपलाइन ला एका पुरुषांचे प्रेत नुकतेच आढळून आल्याने बोलकी सह परिसरात या पुरुषाची आत्महत्या की हत्या ही उलटसुलट चर्चा जोर धरू लागली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव व बोलकी गावचे पोलीस पाटील दादासाहेब शिंदे यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार दिनांक १४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कोपरगाव तालुक्यातील बोलकी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी डाव्या कालव्यात शरीरबांधा मजबूत, रंगाने काळा सावळा, उंची ५.५ इंच, चेहरा गोल, नाक बसके, केस बारीक, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाचाच पायजमा घातलेले अंदाजे वय वर्ष ५० ते ५५ वयाचे बेवारस पुरुषाचे प्रेत कॅनलमधील पाईपलाइनला अडकलेले असल्याच्या हकीगत वरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२५ बी.एन. एस.एस कलम १९४ प्रमाणे अकस्मात बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख हे करत आहे.

सदर बेवारस पुरुषाच्या प्रेताची अद्याप ओळख पटली नसून तरी सदर फोटो मधील मृत व्यक्तीला किंवा त्याचा नातेवाईकांना कोणी ओळखत असेल तर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधात तपासकामी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले आहे.





