हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेआधीच नोकऱ्या
हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेआधीच नोकऱ्या
हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेआधीच नोकऱ्या

कोपरगाव विजय कापसे दि २६ एप्रिल २०२५— महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे एक वर्ष कालावधीच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कोर्सच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा होण्याआधीच विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकऱ्या मिळाल्या असल्याची माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव शहरात सुरू असलेल्या देश विदेशातील विविध पंचतारांकीत हॉटेलमध्ये तसेच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये हमखास नोकरी देणारा एक वर्ष कालावधीच्या हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमास कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत जुलै २०२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा होण्याआधीच विविध पंचतारांकीत हॉटेल मध्ये नोकऱ्या मिळाल्या आहे.




