सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी दक्ष राहून जोमाने काम करावे – विवेकभैय्या कोल्हे
सुनील कदम यांची कोपरगाव भाजपा तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडळ) पदावर निवड, भव्य नागरी सत्कार
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ८ जुन २०२५–भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडळ) पदावर सुनील कदम यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ राघवेश्वर मंदिर, कुंभारी येथे उत्साहात पार पडला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या प्रसंगी सुनील कदम यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले चांगले काम करणाऱ्याला न्याय देण्यात यावा अशी भूमिका बिपीनदादा कोल्हे आणि मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह आम्हा सर्वांची आहे.पक्ष वाढीसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी काम करतो आहोत. पक्षहितासाठी आपण गत निवडणुकीत भूमिका घेतली पण दुर्दैवाने जे यश आपण लोकप्रतिनिधींच्या पदरात टाकले त्याप्रमाणे अपेक्षित काम होताना दिसत नाही हे वास्तव आहे यामुळे नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आपले काम सुरू आहे.जाहिरात गौतम
गेले अनेक वर्षे माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या विचाराने काम करतो आहोत.अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे म्हणून आपली ओळख आहे. मतदारसंघात विकासकामे आणि समस्यांच्या सुटण्याबाबत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण कुठेही मागे हटणार नाही याउलट शासनाला ते प्रश्न निदर्शनास आणून देऊन जनतेला न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य समजून काम करू.पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लोकहिताच्या असणाऱ्या योजनेचा लाभ जनतेला मिळवून देणे ही भूमिका आपले उद्दिष्ट आहे.जाहिरात
या कार्यक्रमाने कोपरगाव मतदारसंघातील एकात्मता, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षवाढीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरण पुढे घेऊन जात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम कायम कोल्हे कुटुंब करत आले आहे.जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे त्याचे अध्यक्ष म्हणून मतदारसंघात पक्ष वाढीसाठी कदम यांनी जोमाने काम करावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या.