आपला जिल्हा

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि २७ मार्च २०२५सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय सप्तशृंगी माता बहुउद्देशीय सेवा संस्था शिंगणापूर यांच्यावतीने श्री क्षेत्र शिंगणापूर ते माता सप्तशृंगी वणीगडा पर्यंत सोमवार दि ७ एप्रिल २०२५ ते शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ या पर्वकाळात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने दिली आहे.

मंदिर

जय सप्तशृंगी माता बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. मच्छिंद्र संवत्सरकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिंगणापुर ग्रामस्थ यांच्या सह संस्थेचे उपाध्यक्ष अनिल हरकल, सचिव जालिंदर आढाव, खजिनदार संजय तुळसकर, सदस्य चंद्रभान खांडेकर, कैलास संवत्सरकर, सोमनाथ कु-हे, अनिल कुलकर्णी, दिलीप थोरात, घनश्याम आढाव, सुनील आढाव, भारत वैद्य, रवींद्र कु-हे, काशिनाथ थोरात, छगनराव कु-हे, भाऊराव खांडेकर आदींनी सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे १७ वे वर्षे असून सोमवार दिनांक ७ एप्रिल रोजी पालखी सोहळ्यांचे प्रस्थान शिंगणापूर येथील माता सप्तशृंगी देवी मंदिरापासून सकाळी ९ वाजता होणार आहे या दिवशीच्या सकाळचा चहा नाश्ता कै. कैलास धोक्रट यांच्या स्मरणार्थ शुभम धोक्रट शुभम नगर येथे, सायंकाळचा चहा नाश्ता नंदू बारसे दत्त मंदिर, अमोल सोनवणे येसगाव, कै. जालिंदर लगड यांच्या स्मरणार्थ लगड परिवार नांदेसर चौकी येथे तर रात्रीचे भोजन व मुक्काम येवला राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा नगरसेवक येवला नगरपालिका दिपक लोणारी यांच्या वतीने असणार आहे.

मंगळवार दिनांक ८ एप्रिल रोजी भाटगाव येथे सकाळचा चहा नाश्ता कै. शिवाजी हरकल यांच्या स्मरणार्थ हरकल परिवारातर्फे, दुपारचे जेवण श्रीराम मंदिर बोरणारे वस्ती पाटोदा रोड येथे कै. सूर्यभान गीते यांच्या स्मरणार्थ गीते परिवाराकडून, सायंकाळचा नाष्टा शिरसगाव वज्रेश्वरी मंदिर येथे चंद्रकांत बुल्ले व वसंत बुल्ले यांच्या कडून तर रात्रीचे जेवण व मुक्काम वळदगाव येथील वादगे परिवाराकडून असेल.

जाहिरात आत्मा

बुधवार दि ९ एप्रिल रोजी सकाळचा नाश्ता पाचोर येथे इंगळे परिवार आणि कारभारी वाघ यांच्याकडून, दुपारचे जेवण इंग्लिश मीडियम स्कूल कोटमगाव येथे नंदूभाऊ संवत्सरकर यांच्या कडून, सायंकाळचा चहा नाश्ता खांडगाव कोटमगाव शिवाजवळ म्हसोबा स्टॉप येथे कै. अशोक शिंदे यांच्या परिवाराकडून तर रात्रीचे जेवण मुक्काम रानवड कुशारे वस्ती येथे विनायक कुशार यांच्याकडून असेल.

जाहिरात

गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळचा नाश्ता काळू बाबा मठ येथे कै. बाळाजी खिल्लारी यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव खिल्लारी यांच्यातर्फे, दुपारचे जेवण वडनेर भैरव येथे आकाश बुल्ले व शुभम शेटे यांच्याकडून, सायंकाळच्या नाश्ता अनिल कुलकर्णी बहादुरी व किशोर भोसले बोराळे यांच्या कडून तर रात्रीचे जेवण जनार्दन स्वामी आश्रम बोराळे येथे कै. प्रल्हादराव ढोमसे यांच्या स्मरणार्थ ढोमसे परिवाराकडून असेल.

जाहिरात

शुक्रवार ११ एप्रिल रोजी सकाळचा नाश्ता कै. नामदेव लगड यांच्या स्मरणार्थ लगड परिवाराकडून वणी गावात, दुपारचे जेवण रामदास वल्टे यांच्याकडून रडतोंडी पायथा वणी येथे त्यानंतर सायंकाळी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी महा भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न होऊन शनिवारी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन नांदुरी बस स्टँडवरून पहाटे ५ वाजता शिंगणापूर कोपरगाव साठी पालखी परत निघेल.

जाहिरात

या पालखी सोहळ्याकरीता शिंगणापूर व परिसरातील अनेक दानशूर भाविकांनी सहकार्य केले असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याची जाहिरात कै. मच्छिंद्र संवत्सरकर यांच्या स्मरणार्थ ज्योती किराणा संवत्सरकर बंधू हे करत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहिती करीता ९८८१८५२१९९, ७७२०००३८३८, ९०४९१५९२९४, ९८२२८९८९४२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे