आपला जिल्हा

रमजान निमित्त मुस्लिम बांधवांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केले वाटप

रमजान निमित्त मुस्लिम बांधवांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केले वाटप

रमजान निमित्त मुस्लिम बांधवांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे केले वाटप

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील जामा मस्जिद ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम धर्मीय बांधवांच्या वतीने पवित्र रमजान सणाच्या पर्वकाळावर चौरंगीनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशरफ बाबूलाल इनामदार व ऍग्रो लक्ष्मी बँकेचे चेअरमन राजू शेख यांच्यावतीने करंजी गावातील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.

जाहिरात

याप्रसंगी करंजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, उपसरपंच शिवाजी जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, उपाध्यक्ष एकनाथ कापसे, मौलाना मोहसीन साहेब, देविदास भिंगारे, अरुण भिंगारे, दादासाहेब भिंगारे, गणेश भिंगारे, हाजी बानेमिया शेख, चौरंगनाथ उद्योग समूहाचे आयुब शेख, मुख्तारभैय्या शेख, अखिल शेख, अशपाक इनामदार, युनूस शेख, मदेखा पठाण,

जाहिरात

शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे यासह शालेय शिक्षण ज्ञानोबा चव्हाण, संगीता सांबारे, स्तुती मिरजकर, उमेश हांडे, मोहन रासकर, सलीम शेख, सुनीता गायकवाड, बाळू धिंदळे, शरद शिंदे, दीपक दवणे, दीपक तुगारे, राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रा. विजय कापसे आदींसह ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात आत्मा

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशराफ इनामदार यांनी बोलताना सांगितले की, गावातील सर्वच मुस्लिम बांधव जामा मस्जिद ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली रमजान निमित्त दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात  मागील वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले होते तर यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत रमजान साजरा केला तर या प्रसंगी उपस्थितांचे आभार राजू शेख यांनी व्यक्त केले. तर उपस्थित सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

मुस्लिम बांधव ईद प्रसंगी शुभेच्छा देतांना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे