आपला जिल्हा

साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगाव ला येण्यासाठी १०० पेक्षा अधिक वाहनांची सुसज्ज व्यवस्था

साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगाव ला येण्यासाठी १०० पेक्षा अधिक वाहनांची सुसज्ज व्यवस्था

साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगाव ला येण्यासाठी १०० पेक्षा अधिक वाहनांची सुसज्ज व्यवस्था

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ एप्रिल २०२५जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी हे साईबाबांचे देवस्थान असून  श्री राम नवमीला शिर्डीमध्ये लाखो भाविक दर्शनाला येत असतात याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साई गाव पालखी द्वारे कोपरगाव तालुक्यातील हजारो भाविक रामनवमीनिमित्त शिर्डीला पायी जात असतात यावेळी संपूर्ण कोपरगाव शिर्डी साई पालखी महामार्ग साई भक्तांनी फुलून गेलेला असतो.

जाहिरात

सालाबाद प्रमाणे याही वर्षी रविवार दि ६ एप्रिल २०२५ रोजी असलेल्या रामनवमीनिमित्त मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साईगाव पालखीने हजारो भाविक कोपरगाव वरून श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे जाणार असून या भाविकांना शिर्डी वरून परत कोपरगावला येण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातर्फे, युवानेते विवेकभैया कोल्हे यांचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे उद्योग समूहातर्फे, काका कोयटे यांच्या समता उद्योग समूह आदींच्या सहकार्याने १०० हुन अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित साईगाव पालखीच्या आयोजकांनी दिली आहे.

जाहिरात

रामनवमीच्या दिवशी शिर्डी वरून कोपरगावला परत येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह जवळ वाहनांची व्यवस्था रात्री  ९ पासून ते पहाटे पर्यंत करण्यात आली असून भाविकांना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, ज्ञानेश्वर गोसावी, राहुल आढाव, संजय मंडलिक, शरद कुलकर्णी, नंदु देवळालीकर, भानुदास लोणारी, नितीन बोरावके, सुनिल लोणारी, अभय दारुंटे, दत्तात्रय जाधव, कृष्णा विसपुते,प्रितिश जाधव,तुषार जाधव,राहुल आदमाने, आदित्य लोणारी, मयुर खडांगळे, राहुल खडांगळे, ओम बागुल ७५०७४१७०२०, कुणाल लोणारी ८७९३५३२६२८, निखिल जोशी ८४८४८६७०६३, मयूर खंडांगळे ९६०४७६४१०४, राहुल खंडागळे ८७९३१५५७०६ या नंबर वर संपर्क साधावा. जाहिरात सौजन्य ओम अलंकार सराफ बाजार कोपरगाव.

जाहिरात आत्मा
अभिषेक प्रसंगी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे