आपला जिल्हा

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सी.पी.आर. प्रशिक्षण कार्यशाळा 

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सी.पी.आर. प्रशिक्षण कार्यशाळा 
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सी.पी.आर. प्रशिक्षण कार्यशाळा 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० एप्रिल २०२५-सी.पी.आर. जनजागृती मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ,आर.बी.एस. के. वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक आणि जिल्हा प्रशिक्षण पथक नाशिक यांच्याकडून  दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ६ टप्प्यात ही प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हास्तरीय इतर सर्व अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आर.बी.एस.के वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण ७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आले

जाहिरात
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तिसऱ्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी , चौथ्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून त्यांच्या भागातील संबंधित सर्व आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका यांचे पाचव्या टप्प्यात जिल्हा ,तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरून त्या कार्य क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांचे तर सहाव्या टप्प्यात गावातील सर्व आरोग्य विषयक निगडीत  समित्यांना आणि सर्व नागरिक यांचे प्रशिक्षण त्या त्या स्तरावर घेण्यात येणार आहे.

जाहिरात
प्रशिक्षण केंद्रावरून देण्यात आलेल्या सी .पी.आर. प्रशिक्षण करिता नाशिक विभागातील  सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी असे एकूण ७५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.तर संबंधित प्रशिक्षण प्राचार्य आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्र,नाशिक डॉ.  दावल साळवे,साथरोग शास्त्रज्ञ डॉ. गणेश शिंदे,डॉ. पंकज ठाकरे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. कैलास भोये यांच्या उपस्थित घेण्यात आले तर या प्रसंगी  डॉ.  आशिष खंडेलवाल यांनी हे प्रशिक्षण घेऊन सर्वांना सी.पी.आर बद्दल मार्गदर्शन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे