शारदानगर परिसरात औषध फवारणी करत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा-डॉ कुणाल घायतडकर
शारदानगर परिसरात औषध फवारणी करत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा-डॉ कुणाल घायतडकर
शारदानगर परिसरात औषध फवारणी करत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा-डॉ कुणाल घायतडकर

कोपरगाव विजय कापसे दि २२ एप्रिल २०२५– कोपरगाव शहरातील शारदानगर परिसरात नगरपालिका प्रशासनाने जंतुनाशक औषध फवारणी करत परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी डॉ.घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकचे डॉ. कुणाल घायतडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकार डॉ.कुणाल घायतडकर यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहर नगरपालिका हद्दीतील शारदानगर मध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती अजून परिसरात नेहमीच लहान मोठ्यांसह जेष्ठ नागरिकांची वर्दळ सुरू असते आणि याच परिसरात मोकाट जनावरे व कुत्रे यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील आठवड्यात कोपरगाव शहरातील एका परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १७ निष्पाप नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे तर काही दिवसापूर्वी एका मोकाट जनावरांने भर रस्त्यात अनेकांना मारल्याची घटना देखील घडली आहे असाच प्रकार शारदानगर परिसरात अथवा शहरात पुन्हा होऊ नये याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.





