कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई कचरा डेपोला भीषण आग
कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई कचरा डेपोला भीषण आग
कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई कचरा डेपोला भीषण आग
कोपरगाव विजय कापसे दि २२ एप्रिल २०२५– कोपरगाव औद्योगिक वसाहती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या मनाई कचरा डेपो ला आज मंगळवार दि २२ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव नगरपालिकेचे कोपरगाव औद्योगिक वसाहती जवळ मनाई कचरा डेपो असून या डेपो मध्ये कोपरगाव शहरातील सर्व कचरा जमा होत असतो याच डेपो ला आज मंगळवार दि २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता लागलेली आग अद्यापही आटोक्यात आली नसून अग्निशमन गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून या कचरा डेपोतील आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे व आगीचे लोळ पहावयास मिळत आहे तर परिसरात उग्र पसरला आहे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात लागलेल्या या भीषण आगीवर अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचारी अथक प्रयत्न करत आपला जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.






