एसएमबीटीच्या डॉक्टरांनी जागतिक स्तरावर केलेल्या कामगिरीचा गौरव
आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये एसएमबीटीच्या डॉक्टरांचा सन्मान
चार डॉक्टरांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प व क्लिष्ट केस स्टडीचे सादरीकरण
जाहिरात
नाशिक विजय कापसे दि २४ एप्रिल २०२५-दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत परवडणाऱ्या दरात पोहोचावी या उदात्त हेतूने सुरू झालेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे केवळ उपचारच नव्हे, तर अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार होतात. येथे कार्यरत तज्ञ डॉक्टरांकडून सातत्याने विविध वैद्यकीय संशोधन देखील केले जात आहे. हृदयविकार विभागाचे संचालक आणि ख्यातीप्राप्त हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा, सर्जरी विभागाचे डॉ. नितीन बस्ते, डॉ. यशवंत रहाडे आणि क्रिटिकल केअर विभागाच्या प्रमुख डॉ. रुचिरा खासने हे एसएमबीटीचे वैद्यकीय नेतृत्व साकारत आहेत. या तज्ज्ञांच्या अतुलनीय कार्याची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. विविध कार्यशाळा, परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि केस स्टडी सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
जाहिरात
(Intro)
हृदयविकारातील नावाजलेले नाव – डॉ गौरव वर्मा
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि ख्यातनाम इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. गौरव वर्मा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ज्ञांमध्ये एक महत्त्वाचे नाव म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुशल हातून एंजिओप्लास्टी, कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी, TAVI (Transcatheter Aortic Valve Implantation), ROTA, IVUS यासारख्या अनेक क्लिष्ट आणि अत्याधुनिक हृदयविकार उपचार अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. कार्यातील अचूकता, परिणामकारकता आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे डॉ. वर्मा यांना देश-विदेशातील विविध वैद्यकीय परिषदांमध्ये, सीएमई (CME) आणि कार्यशाळांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून बोलावले जाते. त्यांनी नाशिकमध्ये देखील अनेक शैक्षणिक उपक्रम आणि कार्यशाळांच्या माध्यमातून हृदयविकार उपचारातील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विविध कार्डियोलॉजिस्टना मार्गदर्शन केले आहे. अलीकडेच इंडिया लाईव्ह 2025 या मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हृदयरोग परिषदेमध्ये डॉ. वर्मा यांनी विविध श्रेणीतील तीन अत्यंत क्लिष्ट केसेस सादर करून उपस्थित 3000+ कार्डियोलॉजिस्ट आणि 200+ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची प्रशंसा मिळवली. याशिवाय, डॉ. वर्मा हे बलून आधारित हार्ट व्हॉल्व्ह शस्त्रक्रियांचे तज्ञ आहेत. त्यामध्ये त्यांनी बलून मीटरल वाल्व्होटोमी (BMV), बलून अरोटिक वाल्व्होटोमी (BAV) व बलून पल्मोनरी वाल्व्होटोमी (BPV) यात त्यांचा हातखंडा आहे. रुग्णांप्रती संवेदनशीलता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव यामुळे एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट हे ग्रामीण भागात देखील जागतिक दर्जाची उपचारसेवा देणारे केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे.जाहिरात
शस्रक्रिया क्षेत्रातील अवलिया डॉ. नितीन बस्ते
एसएमबीटी हॉस्पिटलचे सर्जरी विभागप्रमुख डॉ. नितीन बस्ते यांनी आजवर 2,000 पेक्षा अधिक लॅप्रोस्कोपी आणि 8,000 हून अधिक उघड्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय सादरीकरणे आणि 11 संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्यांनी अमेरिकन हर्निया सोसायटी परिषद (शिकागो), वर्ल्ड काँग्रेस ऑफ हर्निया सर्जरी (सिंगापूर), AMASICON (हैदराबाद) आणि MASICON (नाशिक) यासारख्या परिषदांमध्ये महत्त्वपूर्ण शोधनिबंध व व्हिडिओ सादर केले आहेत. AMASICON 2024 मध्ये त्यांना बेस्ट व्हिडिओ सादरीकरण पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय, डॉ. बस्ते यांनी SAGES 2025 वार्षिक मिटिंगमध्ये (कॅलिफोर्निया, USA) सहभाग घेतला आणि Laparoscopic choledochal cyst excision with laparoscopic hepaticojejunostomy विषयावर सादरीकरण करून 55.50 AMA क्रेडिट्स प्राप्त केले. त्यांचे हे यश एसएमबीटी हॉस्पिटलच्या जागतिक दर्जाच्या सेवेचे प्रतीक आहे.
आयसीयु तज्ञ डॉ. रुचिरा खासने
डॉ. रुचिरा खासने यांना अॅनेस्थेशिया आणि क्रिटिकल केअर मेडिसिन या क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी देशभर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध परिषदांमध्ये मान्यवर वक्ता आणि तज्ञ म्हणून सतत आमंत्रित केले जाते. भारतातील क्रिटिकेअर, इसॅकॉन, जीएआरसी, जीआयसीएस आणि महा क्रिटिकॉन अशा प्रमुख परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे, ज्यामध्ये मेकॅनिकल व्हेंटिलेशन, हेमोडायनॅमिक मॉनिटरिंग, आयसीयूमधील अल्ट्रासाऊंड आणि आधुनिक क्रिटिकल केअर उपचारांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी युरोपियन सोसायटी ऑफ इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन (ESICM) च्या पॅरिस परिषदेमध्ये, नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयात आणि एशिया पॅसिफिक क्रिटिकल केअर असोसिएशनच्या परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या संशोधनामध्ये हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल, डेंग्यूवरील अभ्यास, आणि ऑक्सिजन थेरपीवरील प्रगत विषयांचा समावेश आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्या एक जागतिक पातळीवर ख्याती प्राप्त ICU तज्ञ म्हणून ओळखल्या जातात.
डॉ यशवंत रहाडे ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ ने सन्मानित
२०२४ मध्ये भारतात प्रथमच इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडो सर्जन (IAGES) द्वारे जागतिक एंडोस्कोपिक सर्जरी काँग्रेस (WCES) ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ही परिषद इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोसायटीज ऑफ एंडोस्कोपिक सर्जन (IFSES) अंतर्गत झाली असून या परिषदेत IAGES (भारत), SAGES (अमेरिका), KSELS (दक्षिण कोरिया) यांसारख्या प्रमुख संस्थांचा सहभाग होता. एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या जनरल सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ यशवंत रहाडे यांनी कोलकाता येथील बिस्वा बांग्ला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ एंडोस्कोपीक सर्जरी (WCES) येथे संशोधन सादरीकरणातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठसा उमटवला. असेसमेंट स्केल ऑफ सर्जिकल प्लान इन इटीइपी सर्जरी (ASSPES) या विषयावरील त्यांचे संशोधन ३०० हून अधिक जागतिक सादरीकरणांपैकी मुख्य व्यासपीठावर सादर होण्यासाठी निवडले गेले होते. या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारताचे भावी सरन्यायाधीश मा. न्या. बी. आर. गवई, IFSES चे अध्यक्ष डॉ. एडुआर्डो टार्गरोना, आणि IAGES चे अध्यक्ष डॉ. सुभाष अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून डॉ. राहाडे यांना कौतुकाचा वर्षाव झाला असून, प्रसिद्ध TRAM सर्जरीचे जनक डॉ. अश्विन मासुरकर यांचाही विशेष संदेश त्यांना लाभला. क्लिनिकल प्रॅक्टिस, सर्जिकल प्रशिक्षण, संशोधन अभ्यास हे जगातील एकमेव स्केल आहे जे TEP शस्त्रक्रियेमध्ये सर्जिकल प्लेनचे ग्रेडिंग करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.