आपला जिल्हा

निंबंधक कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा धरणे आंदोलन

निंबंधक कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी;अन्यथा धरणे आंदोलन
निंबंधक कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० एप्रिल २०२५कोपरगांव तालुका खरेदी विक्री, निबंधक कार्यालयातील गेल्या अनेक वर्षापासुन अनागोंधी कारभार चालु आहे. या कार्यालयात जवळजवळ ९० टक्के कर्मचारी हे बेकायदेशीर कार्यरत आहे.त्यांना कुठलीही शासकीय अधिकारी यांची ऑर्डर नाही किंवा कंत्राटी कर्मचारी असल्याचे नोंद नाही. किंवा मदतनीस म्हणून …. जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही किंवा शायकीय  मानधन दिले जात नाही. परंतु हे कर्मचारी बिन पगारी फुल अधिकारी आहेत हे सर्व लोक निबंधकाच्या मर्जीने खरेदीविकी साठी आलेल्या नागरीकांना फसवून लुटतात. ते नागरीकांकडुन पावतीला पावती घेतात म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे ६ टक्के स्टॅम्प डयुटी असते. ही मंडळी नागरीकांकडुन ६ टक्के निंबधकाला वेगळे दयावे लागतात अशी बतावणी करून नागरिकांकडुन स्टॅम्प डयूटी उकळतात. या प्रकरणात जवळजवळ हे सर्व दस्त लेखनीक सामील करून घेतलेले आहे त्यामुळे आशा तऱ्हेने सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची खातेनिहाय चौकशी होवून जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व विना परवानगी शासकीय कार्यालयात शासकीस दप्तर हाताळणाऱ्या अनाधिकृत कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे.सदर चौकशी आदेशाचा अहवाल प्रसिद्धीसाठी मिळावा. सदर बाब तातडीने कार्यवाहीत करण्यात यावी अन्यथा २१ मे  पासुन तहसिल कार्यालय कोपरगांव समोर धरणे अंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना शिवसेनेचेवतीने जिल्हा मुद्रांक अधिकारी  यांना २८ एप्रिल रोजी निवेदन देत दिला आहे.

जाहिरात
सदर निवेदन कोपरगाव शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना शहर अध्यक्ष पै.गगन हाडा यांच्या नेतृत्वात देण्यात आले या प्रसंगी त्यांचा समवेत लक्ष्मण साबळे,
दगू पाटील गुडघे,निखिल कंकाळे,पियुष सैंदाणे, सोनू साबळे,आकाश कुडिया,वैभव शेलार, काना हाडा,विनय टाक, साहिल पटवेकर, दीपेश वाघमारे,करण पाटोळे आदी युवासैनिक उपस्थित होते

जाहिरात
या निवेदनात म्हटलें आहे की, एखादा दस्त लेखनीक किंवा अॅडव्होकेट या प्रकरणाला स्विकारत नसेल तर त्यांचे काम करण्यास आडचणी निर्माण केल्या जातात सर्व्हर डाउन आहे अशी बतावणी करुन दस्त नोदविण्यास जवळजवळ नकार देतात. उदया यावे लागेल. असे सांगून पुढे ढकल्याचा बेत करतात. मात्र नागरीक भयभीत होवून त्यांची मागणी मान्य करतात व आधिकचे ६ टक्के देण्यास कबुल होतात. अन्यथा सर्व्हर डाउन आहे असे सांगुन निबंधक कार्यालयातच आडवे होतात व तेथे झोपा काढतात.

जाहिरात
 नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार एका जमीनीची दस्त नोंदणी केलेली परंतु त्या जमिनीवर श्रीराम फायनान्स, पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था, गौतम सहकारी बैंक, चांदेकसारे सोसायटी, चंद्रपंढरी पतसंस्था, पोहेगांव पतसंस्था, सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटी, आदी संस्थेचा कायदेशीर बोजा असल्याचा उताऱ्यावर नमुद आहे. असे असतांना सदर बेकायदेशीर खरेदीखत नोंदविण्यात आले आहे. सदर प्रकार हा सहजासहजी झालेला नाही त्यासाठी मोठी देवाण घेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण कोपरगाव निबंधक कार्यलायात सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराची तातडीने चौकशी करत संबंधित दोषी वर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे