आपला जिल्हा

शहरात पुन्हा चोरीचा प्रकार – रेव्हेन्यू कॉलनीत डॉ. सुर्यवंशी यांच्या घरात साडेतीन ते चार लाखांचा ऐवज लंपास

 शहरात पुन्हा चोरीचा प्रकार – रेव्हेन्यू कॉलनीत डॉ. सुर्यवंशी यांच्या घरात साडेतीन ते चार लाखांचा ऐवज लंपास

शहरात पुन्हा चोरीचा प्रकार – रेव्हेन्यू कॉलनीत डॉ. सुर्यवंशी यांच्या घरात साडेतीन ते चार लाखांचा ऐवज लंपास

जाहिरात

कोपरगाव  विजय कापसे दि ९ मे २०२५- कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. १९ एप्रिल रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनीमध्ये मोठी चोरी झाल्यानंतर आज ९ मे रोजी पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत डॉ. विवेक सूर्यवंशी आणि  प्रतिभा सुर्यवंशी यांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. हे दाम्पत्य गावी गेले असताना, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडी कोंडा कटरच्या साह्याने कापून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करत सुमारे ३ लाख रुपये रोख आणि २ तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

जाहिरात

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही च्या आधारे शोध सुरू केला असून श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत तक्रारदार डॉक्टर विवेक सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती दिली.

जाहिरात

सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कोपरगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे