माणसा माणसातील हरवत चाललेली माणुसकी हेच खरे दुर्दैव आहे – प्रशांत वाघ

माणसा माणसातील हरवत चाललेली माणुसकी हेच खरे दुर्दैव आहे – प्रशांत वाघ
माणसा माणसातील हरवत चाललेली माणुसकी हेच खरे दुर्दैव आहे – प्रशांत वाघ

Nashik vijay kapse दि ६ जुन २०२६-गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने घेत असलेल्या पुस्तकावर बोलू काही या उपक्रमा अंतर्गत आज येवल्याचे प्रसिद्ध कवी तथा मुखपृष्ठ परिक्षक प्रशांत वाघ यांनी २६९ वे पुष्प गुंफले. पुस्तकावर बोलू काही या उपक्रमाअंतर्गत पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारतांना त्यांनी ग्रामीण जीवनशैलीचा बदलता चेहरा, हरवत चाललेली ग्रामीण संस्कृती, माणसामाणसातील हरवत चाललेली माणुसकी हेच खरे दुर्दैव आहे. समाजाच्या, शेतकऱ्याच्या व्यथा साहित्यातून मांडता आल्या पाहिजेत. समाजातील वास्तव चित्र आपल्या लेखनीत उतरवले पाहिजे. साहित्यिकांनी ग्रामीण जीवनशैलीवर लिहले पाहिजे असे प्रसिद्ध कवी, लेखक, समिक्षक प्रशांत वाघ यांनी प्रतिपादन केले

नाशिक येथील हुतात्मा स्मारकात गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमा अंतर्गत २६९ वे पुष्प गुंफण्यासाठी कवी प्रशांत वाघ यांना निमंत्रित केले होते. कवी प्रशांत वाघ यांनी यांच्या वेदनांकुर या कवितासंग्रहाची पार्श्वभूमी, तसेच कौटुंबिक पार्श्वभूमी उलगडून सांगितली. त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा, वेदना आपल्या संग्रहात व्यक्त केल्या आहेत.

यावेळी सोमनाथ साखरे अध्यक्षस्थानी होते तर गिरणा गौरवचे सुरेशजी पवार यांनी सुत्रसंचलन केले गझलकार तू.सी. ढिकले यांनी शेवटी आभार मानले. याप्रसंगी सुशीला पिंपरकर, रंजना वाणी, अनंत वाणी, सुहास टिपरे, जयश्री राणे, शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ, सदस्य जयप्रकाश वाघ, शुभम आहिरे, चेतन मांडवडे, बाळासाहेब गिरी, मधुकर गिरी, सौ. सुंनदा पाटील, आदी उपस्थित होते.





