संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनीच्या अनेक अभियंत्यांची लाखोंच्या पॅकेजवर बहुराष्ट्रीय  वित्तीय कंपनीत नोकऱ्या- अमित कोल्हे

संजीवनीच्या अनेक अभियंत्यांची लाखोंच्या पॅकेजवर बहुराष्ट्रीय  वित्तीय कंपनीत नोकऱ्या- अमित कोल्हे

संजीवनीच्या इंजिनिअरींगच्या तीन विद्यार्थ्यांना वार्षिक  पॅकेज २७ लाख व तीन विद्यार्थ्यांना  २१ लाख रुपये वार्षिक पॅकेज वर  बहुराष्ट्रीय  वित्तीय कंपनी मध्ये नोकऱ्या – अमित कोल्हे

एकुण नऊ अभियंत्यांना नोकरीची संधी

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १७ मे २०२५: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या व कॉम्प्युटर इंजिनिअरींग आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील शिक्षकांच्या प्रयत्नाने बहुराष्ट्रीय  वित्तीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतींमध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रत्येकी वार्षिक २७ लाख  पॅकेजवर, तीन विद्यार्थ्यांची प्रत्येकी वार्षिक  २१ लाख, एकाची वार्षिक १६ लाख, एकाची वार्षिक ९ लाख तर एकाची वार्षिक ८ लाख   पॅकेजवर नोकऱ्यांसाठी निवड झाली, असे एकुण नऊ विद्यार्थ्यी कंपनीने नोकरीसाठी निवडले, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

पत्रकात पुढे म्हटले आहे की राहुल कैलास जगधने, वैष्णवी  सचिन मोहाडकर व प्रथमेश  संतोष  सोनवणे यांची वार्षिक   २७ लाख पॅकेज वर निवड झाली. यशोदिप सुधिर भामरे, ज्ञानेश्वरी  विजयराज डोळझाके व ऋषिकेश राजेंद्र वाबळे यांची वार्षिक  पॅकेज २१ लाखांवर निवड झाली. संकेत श्रीराम दवंगे याची वार्षिक १६ लाख पॅकेजवर निवड झाली. प्रणव विक्रमादित्य गाडे व विनित हर्षद  जोशी  यांची अनुक्रमे वार्षिक ९ लाख व वार्षिक ८ लाख  पॅकेजवर निवड झाली.

जाहिरात

श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की अनेक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंते मिळत नाही, तर अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाही, हे वास्तव संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी जानले. ही विसंगती दुर करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आणि नामांकित उद्योगांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात केला. त्याचा चांगला परीणाम प्लेसमेंटसाठी पहिल्या ऑटोनॉमस बॅच पासुन दिसत आहे. ग्रामिण भागातील मुला मुलींना सरकारी आस्थापना किंवा नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात, काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे, या हेतुने सुमारे ४२ वर्षांपूर्वी  संजीवनी शैक्षणिक  संकुलाची स्थापना स्व. कोल्हे यांनी केली. त्यांची दूरदृष्टीता सातत्याने सिध्द होत आहे. तर संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या सर्व अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

अमित कोल्हे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे