संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि ५ जुन २०२५ : — संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, सप्तर्षी मळा शाखा व जेऊर पाटोदा शाखा,कोपरगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूढ वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजन करून वृक्षारोपणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,विश्वस्त विशाल झावरे,मुख्याध्यापक सचिन मोरे, स्थानिक नागरिक,पालक,विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद झाली. या दिवसाचे औचित्य साधून १९७३ मध्ये जगाने आपला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी हा विशेष दिवस साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन एका अर्थपूर्ण वृक्षारोपणाच्या उपक्रमासह साजरा करण्यात आला.









