कर्मवीर काळे करंजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा
कर्मवीर काळे करंजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १७ जुन २०२५-शासनाच्या नियमाप्रमाणे दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १६ जून २०२५ पासून राज्यातील बहुतांश भागात शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या थाटामाटात विविध उपक्रमांनी सबंध राज्यभरात साजरा करण्यात आला.
जाहिरात
त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय कारभारी आगवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रा.विजय कापसे, करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष आगवन, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, शाळेचे मुख्याध्यापक डी एम माळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि १६ जून रोजी मोठ्या उत्साहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रवेशित सर्व नव विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा स्वागत समारंभ साजरा करण्यात आला.जाहिरात
याप्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवन, राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रा. विजय कापसे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन यांनी नवंप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करत शुभेच्छा दिल्या.जाहिरात गौतम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षण ललित जगताप उपस्थितांचे आभार सांगळे सर यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.