राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी जाधव यांची निवड
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी जाधव यांची निवड
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १९ जुन २०२५–कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील प्रगतशील शेतकरी तथा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तानाजी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या शुभहस्ते निवड पत्र देत करण्यात आली आहे.
जाहिरात
याप्रसंगी ॲड. संदीप वर्पे यांनी नवनियुक्त कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांचे अभिनंदन करताना सांगितले की, जाधव हे गेले अनेक वर्षापासून शरदचंद्र पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी स्थानिक पातळीवर तसेच ग्रामीण भागात पक्षाची विचारधारा आणि कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्यावरील या जबाबदारीमुळे तालुक्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास अँड संदीप वर्पे यांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.जाहिरात
तर त्यांच्या या निवडीबद्दल नगर जिल्हा प्रभारी व माजी आमदार अशोकबापू पवार, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यासह अनेक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
जाहिरात गौतम
नवनियुक्त कार्याध्यक्ष जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली आहे ती संपूर्ण जबाबदारी निष्ठेने पार पाडत संपूर्ण तालुक्यातील जनतेपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवत पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी जाधव यांनी ॲड. संदीप वर्पे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.