आपला जिल्हा

धोत्रे जोहान वॉरियर्सचा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

धोत्रे जोहान वॉरियर्सचा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
संघाने मिळविले प्रथम नंबरचे बक्षीस
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२५कोपरगाव शहरातील टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित टिळक चौक प्रीमियर लीगचा  अंतिम सामना व बक्षीस वितरण सोहळा युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या टिळक रोड चॅम्पियन ट्रॉफी चे मानकरी धोत्रे गावातील योगेश बोजगे व जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोहान वॉरियर्स या संघाने चॅम्पियन ट्रॉफी सन्मानचिन्ह व रोख एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविल्याबद्दल धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण संघाचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं मंगळवारी (दि १०) सन्मान करण्यात आला.

जाहिरात
   
      यावेळी टीमचे कर्णधार जमील शेख यांचा सत्कार  सुरेश जाधव (संचालक संजीवनी बँक) यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या टीमचे अष्टपैलू खेळाडू योगेश बोजगे यांना बेस्ट फिल्डर अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर करडे सर यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे यांनी व्यक्त केले.

जाहिरात

या प्रसंगी ग्रामपंचायत तसेच गावातील विविध संस्थाचे आजी माजी पदाधीकारी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या न वॉरियर्स संघातील सर्व सदस्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे