बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजीत वृक्षारोपण
बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजीत वृक्षारोपण
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २१ जुन २०२५– संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या वाढदिवसानिमित्त इतर अवाढव्य खर्चाला फाटा देत पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळे देशी वृक्षांचे रोपण करत वृक्ष संवर्धन तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तूचे वाटप करत आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरवत आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील आवाहन केले त्यानुसारच तालुक्यातील कानाकोपऱ्यात शनिवार दिनांक २१ जून रोजी असलेल्या त्यांचा वाढदिवसानिमित्त वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत सबंध तालुक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला.
जाहिरात
त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात देखील लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, माजी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आगवन यासह देविदास भिंगारे, अरुण भिंगारे, गोरख भिंगारे, गणेश भिंगारे, बापू भिंगारे, गोकुळ जाधव, बाळासाहेब भिंगारे, साईनाथ भिंगारे, कृष्णा शहाणे, संतोष पवार, सुनील डोखे,रमेश मोरे, जुबेर शेख, दगु कापसे आदींनी विविध देशी वृक्षाचे रोपण करत बिपिनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.जाहिरात