आपला जिल्हा

ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा- डॉ.सुजय विखे पाटील 

ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा- डॉ.सुजय विखे पाटील 

ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा- डॉ.सुजय विखे पाटील 

जाहिरात

राहाता विजय कापसे दि २२ पजुन २०२५ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम निर्धारित वेळेत पुर्ण करुन, आरोग्‍य सेवा सक्षम आणि दर्जेदारपणे मिळावी या दृष्‍टीनेच सर्व सुविधांची उभारणी करण्‍याच्‍या सुचना डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्‍या.

जाहिरात

जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या निधीच्‍या माध्‍यमातून राहाता येथील ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम तसेच आधिकारी, कर्मचा-यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या नियोजित जागेची पाहाणी डॉ.विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्‍य विभागाच्‍या आधिका-यां समवेत केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे, आरोग्‍य आधिकारी डॉ.गोकूळ घोगरे, राहाता नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह अन्‍य आधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

डॉ.सुजय विखे पाटील यांनी आधिका-यां समवेत विस्‍तारीत ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या कामाचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्‍णालयात सध्‍या सुरु असलेल्‍या कामाची पाहाणीही केली. ग्रामीण रुग्‍णालयात येणा-या सर्वसामान्‍य माणसांचा विचार करुन, आवश्‍यक असलेल्‍या सर्व सुविधांची उभारणी करुन घ्‍यावी. कामात कोणत्‍याही तृटी राहू नयेत, सर्व कामे दर्जेदार व्‍हावे अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

जाहिरात गौतम

ग्रामीण रुग्‍णालय हे सामान्‍य माणसाला आपले वाटले पाहीजे. या रुग्‍णालयातून मिळणारी आरोग्‍य सेवा तत्‍पर असावी यासाठी आवश्‍यक सुविधा निर्माण कराव्‍यात. यासाठी अधिकचा निधी लागल्‍यास ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या माध्‍यमातून उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

जाहिरात

डॉ.सुजय विखे पाटील यांनी श्री.साईराजा अमृतेश्‍वर भव्‍य पायी दिंडी सोहळ्याचे स्‍वागत करुन पंढरपुरकडे निघालेल्‍या वारक-यांना शुभेच्‍छा दिल्या. शिर्डी मतदार संघातील नादुर्खी, साकुरी, तरकसवाडी, पिंप्री निर्मळ आदि गावांमधून निघालेल्‍या पायी दिंडी सोहळ्यात ते काही काळ सहभागी झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे