कोपरगाव विजय कापसे दि २३ जुन २०२५–निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी, श्री सिद्धेश्वर महाराज, ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज, साधू महंतांच्या शुभाशीर्वादाने तसेच असंख्य भक्तांच्या सहकार्याने कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन केले असून या कथेचा ध्वजारोहण समारंभ रविवार दिनांक २२ जून रोजी महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जाहिरात
याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास संवत्सरकर, उपसरपंच श्याम संवत्सरकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष रंगनाथ संवत्सरकर, माजी सरपंच भीमा संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश संवत्सरकर, प्रसाद आढाव, गणेश राऊत, अशोक तराट, अमृत संजीवनी संचालक जालिंदर आढाव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत संवत्सरकर, बाळासाहेब संवत्सरकर, देविदास संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, मच्छिंद्र संवत्सरकर, हिरालाल संवत्सरकर, दिलीप आढाव, किरण कु-हे, शरद संवत्सरकर, समाधान कु-हे, आबा संवत्सरकर आदी शिंगणापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.जाहिरात
सोमवार दि ३० जून २०२५ ते गुरुवार ते ३ जुलै २०२५ या पर्वकाळात श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज पंचदशनाम जुना आखाडा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय अध्यक्ष यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा संपन्न होणार असून या प्रसंगी मोठ्या भाविक भक्तांनी उपस्थित रहात शिवमहापुराण कथेचा तसेच दररोज कथा संपल्यानंतर होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.जाहिरात गौतम