आपला जिल्हा

अमृतवाहिनी तंत्रनिकेतन चा उत्कृष्ट निकाल

अमृतवाहिनी तंत्रनिकेतन चा उत्कृष्ट निकाल
अमृतवाहिनी तंत्रनिकेतन चा उत्कृष्ट निकाल
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ७ जुलै २०२५–गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी हे वैशिष्ट्य दाखताना नुकत्याच झालेल्या एमएसबीटीइ च्या वार्षिक परीक्षेत गुणवत्ता पूर्ण निकालाची परंपरा जपली असून घवघवीत यश मिळवले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्हि. बी.धुमाळ यांनी दिली आहे.

जाहिरात
या निकालाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य प्रा धुमाळ म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व मा आ. डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निक ने राज्यपातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ यांच्याकडून झालेल्या परीक्षेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम वर्षात रुची दुबे येणे 85.03% प्रथम क्रमांक मिळवला आहे तर द्वितीय वर्षामध्ये सृष्टी देशमुख हिने 89% मार्क प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि तृतीय वर्षात अर्जुन देशमुख याने 88.92% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

जाहिरात

 तर इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये प्रथम वर्षात धनश्री फुलसुंदर हिने 85.29 टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय वर्षात सृष्टी कोटकर हिने ८९.४४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर तृतीय वर्षात प्रसाद राहींज याने 94.64% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.मेकॅट्रॉनिक विभागात प्रथम वर्षात आर्या कडलग हिने 83.14% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय वर्षात अजिंक्य काळे यांनी 83.55% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला .तृतीय वर्षात विराज खालकर यांनी 91.48% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला.

जाहिरात

सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्रथम वर्षात राहुल चौधरी यांनी 87.48% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय वर्षात कृष्णराज मंडलिक याने 95.66% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला तर तृतीय वर्षात रोहन भुसारे यांनी 89.68% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कॉम्प्युटर टेक्नोलॉजी विभागात प्रथम वर्षामध्ये पूजा आंब्रे हिने 89.94%  गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय वर्षात सपना साबळे ने 94.18 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तृतीय वर्षात ओंकार मंडलिक याने 95.77% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागामध्ये प्रथम वर्षामध्ये तृप्ती चौधरी येणे 80.70% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय वर्षांमध्ये तनुजा आढाव ने 94.18% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आणि तृतीय वर्षांमध्ये मयुरी गुंजाळ ने 93.69% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

जाहिरात

मुलींनी या सर्व निकालांमध्ये बाजी मारली आहे या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही बी धुमाळ, उपप्राचार्य जीबी काळे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे