आपला जिल्हा

सडे  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या अनीता बारहाते यांची बिनविरोध निवड

सडे  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या अनीता बारहाते यांची बिनविरोध निवड

सडे  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या अनीता बारहाते यांची बिनविरोध निवड

जाहिरात गौतम

कोपरगाव विजय कापसे दि १० जुलै २०२५:-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मीराबाई सुदाम बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर काळे गटाच्या अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

जाहिरात

सडे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच  आशाताई बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सौ.अनीता संतोष बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक चंद्रकांत जोशी यांनी सौ.अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंचसर्व सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच  अनीता संतोष बारहाते यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच आशाताई बारहातेमावळत्या उपसरपंच  मीराबाई सुदाम बारहातेसदस्य नितीन बारहातेसिध्दार्थ मोकळसागर गोरेमिनाताई कुसाळकररावसाहेब बारहाते, बापुराव बारहाते, अशोक बारहातेगोपीनाथ बारहातेविजय बारहातेरमेश वाकचौरेसुदाम बारहातेगोकुळ बारहातेसतिष बारहातेसुनिल बारहातेसंजय बारहातेकैलास बारहातेअनिल बारहातेरोषण बारहातेआप्पासाहेब गुंजाळप्रभाकर बारहाते, शामराव बारहातेबाबासाहेब बारहातेग्रामसेवक चंद्रकांत जोशी आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व सडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

नवनिर्वाचित उपसरपंच  अनीता बारहाते यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उपसरपंचपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच  अनीता संतोष बारहाते यांनी आ. आशुतोष काळे आभार मानले आहे.

जाहिरात

ज्या विश्वासाने माझ्यावर उपसरपंचपदाची दिलेली जबाबदारी हि फक्त जबाबदारी नाही, तर ग्रामस्थांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. त्या विश्वासाला तडा जावू न देता सरपंचसर्व सदस्य यांच्या सहकार्यातून सडे  ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवून  गावाच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवणार असल्याचे उपसरपंच सौ.अनीता बारहाते यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे