आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ व्या गळीत हंगामाची तयारी; मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ व्या गळीत हंगामाची तयारी; मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ व्या गळीत हंगामाची तयारी; मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न

जाहिरात गौतम

 कोपरगाव विजय कापसे दि १३ जुलै २०२५ :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी अंतिम टप्यात आली असून त्यादृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक प्रशांत घुले यांच्या हस्ते रविवार (दि.१२) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जाहिरात

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा यासाठी नवीन कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ सुरु करणेच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून त्याची सुरुवात मिल रोलर पूजनाने करण्यात आली आहे. कारखान्याच्या यंत्र सामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले आहे.

जाहिरात

            याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, संचालिका सौ.वत्सलाबाई जाधव,सौ.इंदुबाई शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर शुगर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे