आपला जिल्हा

डाळिंब चोरास ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

डाळिंब चोरास ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद
शेतकऱ्याचा शेतातून केले होते डाळिंब चोरी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुलै २०२५मढी बु शिवारात अर्जुन दिलीप गवळी रा मढी बु ता कोपरगाव या शेतकऱ्याचे डाळींबाचे बागेतून डाळींब चोरुन नेले असल्याची घटना घडली असुन अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना फोन द्वारे मिळताच कोळी यांनी पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, बीट अंमलदार पोहेकों दहिफळे, पोकों सानप तसेच पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संदीप बोटे, पोकों अनिस शेख, पोकॉ अमोल फटांगरे, पोकॉ बेनके यांचे सह घटनाठिकाणी जाऊन पाहणी करुन शेतकरी यांचेकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे तपास सुरु करुन तपास पथकास शहा कारवाडी, कोळगाव माळ भागात पाठवुन आरोपीचा शोध घेतला असता

जाहिरात

गौतम विष्णु जगताप वय ४२ रा उजणी ता सिन्नर व गोरख सखाहारी बर्ड वय ३९ रा दहिवडी ता सिन्नर हे दोघेजण त्यांचेकडील मोटार सायकलवर गोण्यामध्ये भरुन काहीतरी घेऊन जात असताना शहा ता सिन्नर परीसरात मिळुन आले असता त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडे असलेल्या गोण्यामध्ये डाळींब भरल्याचे दिसले त्याचेंकडे विचारपुस केली असता त्यांनी प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचे डाळींब हे मढी बु शिवारातुन चराचे कडेला असलेल्या डाळींब बागेतुन चोरले असल्याची कबुली दिल्याने सदर दोन्ही इसमांना त्यांचे ताब्यात मिळालेल्या दोन मोटार सायकल व डाळींबाचे गोण्यासह ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अर्जुन दिलीप गवळी रा मढी बु ता कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून  गु र नं २०९/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे डाळींब चोरीचा गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयात आरोपीस अटकेची कारवाई चालु असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन आणखी शेतकऱ्यांचे डाळींब चोरी तसेच मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीकडून गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल व सुमारे १५५ किलो डाळींब शेंद्री भगवा जप्त करण्यात आले आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ  मधुसूदन दहिफळे हे करीत आहेत.

जाहिरात
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने . यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पोहेकॉ मधुसूदन दहिफळे, पोहेकॉ संदीप बोटे, पोकॉ सानप, पोकॉ अनिस शेख, पोकॉ फटांगरे, पोकॉ बेनके, पोकॉ जाधव यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मधुसूदन दहिफहे हे करीत आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे