आपला जिल्हा
थोरात कारखाना कार्यस्थळावर २५ जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात
थोरात कारखाना कार्यस्थळावर २५ जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

संगमनेर विजय कापसे दि १९ जुलै २०२५- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिर प्रांगणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा.आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२५ जुलै ते शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.







