आपला जिल्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि २१ जुलै २०२५–महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व राज्याच्या राजकारणातील कार्यक्षम, लोकप्रिय नेतृत्व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एक आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनिषंकर आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी येताना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असून, कोपरगावातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मा. आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: ८१८१९०९०९० या क्रमांकावर करण्यास सांगण्यात आले आहे. “आरोग्य हीच खरी संपत्ती” या मूल्याला अनुसरून भाजपा कोपरगावचा सामाजिक उपक्रम जनतेसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे.






