आपला जिल्हा

के.जे.सोमैया महाविद्यालयात ध्येयपूर्ती अकॅडमी चे उद्घाटन संपन्न 

के.जे.सोमैया महाविद्यालयात ध्येयपूर्ती अकॅडमी चे उद्घाटन संपन्न 

के.जे.सोमैया महाविद्यालयात ध्येयपूर्ती अकॅडमी चे उद्घाटन संपन्न 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ जुलै २०२५कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासुन ध्येयपूर्ती अकॅडमी ची स्थापना करण्यात आली. या अकॅडमी चे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल मा. साहेबराव शेळके यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात ध्येयपूर्ती अकॅडमीची भूमिका नमूद करतांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर त्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने ही अकॅडमी स्थापन झाल्याची माहिती दिली.

जाहिरात

महाविद्यालयात सुरु झालेली ही ध्येयपूर्ती अकॅडमी तालुक्यातील सर्वात कमी फी आकारणारी अकॅडमी असल्याचे म्हटले. आपल्या उद्घाटकीय मनोगतात  लेफ्टनंट कर्नल मा. साहेबराव शेळके यांनी ज्याला आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचा आहे त्यानेच  स्पर्धा परीक्षेच्या वाट्याला जावं. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही गरिबी हा श्रीमंत होण्यासाठीचा सर्वात मोठा मार्ग आहे. असे म्हटले. महाविद्यालयातील अकॅडेमीची प्रशंसा करतांनाच त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून सातत्यपूर्वक प्रयत्न करणे हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे म्हटले.

जाहिरात

यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीसउप निरीक्षक  किशोर पवार यांनी पोलीस भरती करतांना कशाप्रकारे अभ्यास करावा, मैदानी चाचणी परीक्षेला कसे सामोरे जावे यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात  संदीपराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला देतानांच महाविद्यालयात सुरु झालेली ही ध्येयपूर्ती अकॅडमी लवकरच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि रोजगाराचे केंद्र बनेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अकॅडेमीचे सह-समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके यांनी या अकॅडमी मार्फत राबवित असलेल्या सर्व उपक्रमांची  विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अकॅडेमीचे समन्वयक डॉ. सुनील कुटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा.रवींद्र जाधव, श्री. कुऱ्हाडे यांच्यासह या अकॅडमीमध्ये मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व अकॅडेमीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे