आपला जिल्हा

श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन साजरा

श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन साजरा

श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन साजरा

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५- शिर्डी येथील शताब्दी मंडपात साई मंदिराच्या कशारोहनाला ७३ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने साईबाबांच्या मंदिराच्या कळसाचे प्रतिकात्मक पूजन व पारनेरकर महाराजांच्या पादुका पूजन व साईबाबांच्या आरती संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर पूर्णाचार्य आनंदराव मुठाळ, अरविंदराव पाटील, धर्माधिकारी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब, मा नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी विश्वस्थ सचिन भाऊ तांबे, अनिलभाऊ सोनवणे, बाळासाहेब जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्णाचार्य अरविंदराव पाटील म्हणाले ज्यावेळी समस्या निर्माण होतात त्यावेळी समस्या सोडविण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो. श्रद्धावान लाभते ज्ञानं. पारनेरकर महाराजांनी केवळ विचार मांडले नाहीत तर त्याला आचरणाची जोड दिली. श्रद्धा, सबुरीचा मंत्र साईबाबांनी दिला तर नीती, आचरण हा मंत्र पारनेरकर महाराजांनी दिला. कार्यक्रमाची वाटचाल कशी झाली याबाबत राजीव मुठाळ यांनी सांगितले २९ सप्टेंबर १९५२ रोजी साईबाबा मंदिराचे कलशारोहण प पू रामचंद्र महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कलशारोहण संन्याशाचे हस्ते करण्याची परंपरा. प्रारंभी नकार. साईबाबांचा दृष्टांत. माझी व ईश्वराची इच्छा. असे मनोगत बाळासाहेब जोशी. (मंदिराचे माजी मुख्य पुजारी) यांनी व्यक्त केले

जाहिरात

बाबांच्या मंदिरावरील ध्वज निमगाव इथून दिसायचा. बाबा अनेक रुढी परंपरेला छेद देत होते. मंदिराच्या कळसाचे दर्शन म्हणजे बाबांचे दर्शन असे मानणारे अनेक भाविक आहेत. शिवाजीराव गोंदकरमाजी नगराध्यक्ष यांनी साईबाबा यांच्यावर लेखन करणाऱ्या व्यक्तींसाठी मदत करणारा स्वतंत्र विभाग असावा. असे मत मांडले साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब यांनी सर्वांचे स्वागत करून
बाबांची समाधी १५/१०/१९१८ पूर्णवाद परिवार एक लाखाचे वर आहे. जीवन कसे जगावे याची शिकवण पूर्णवाद परिवार देतो. हाच मंत्र श्रद्धा, सबुरी या माध्यमातून बाबांनी दिला. बाबांची शिकवण शिकविणे जगाला आवश्यक आहे. असे मत प्रगट केले

तसेच प्रमुख वक्ते पूर्णाचार्य आनंदराव मुठाळ यांनी विवेचनातून आपले मत व्यक्त करताना म्हटले अतिशय सुरेख अशा पद्धतीचे आयोजन आपण काही वर्षांपासून करीत आहोत. त्यासाठी साईबाबा संस्थानचे आम्ही आभारी आहोत. पारनेरकर महाराजांना असे वाटले की बाबांच्या मंदिराचे कलशारोहण करणे हे मोठे काम आहे. त्यासाठी अन्य अधिकारी व्यक्ती शोधावा. मात्र स्वतः साईबाबांनीच कलशारोहणाचे काम पारनेरकर महाराजांनी करावे असा दृष्टांत दिला.
आधी कळस मग पाया. वेरुळ येथील कैलास लेणे असे आहे की आधी कळस तयार झाला आणि नंतर पाया घडला. फोटो ही पाश्चात्य कल्पना आहे. मूर्ती ही भारतीय परंपरा आहे. बाबांची मूर्ती स्थापन करा आणि रोज रुद्राचा अभिषेक करावा ही कल्पना रामचंद्र महाराजांनी दिली. हिंदू धर्म हा मुख्यत्वे सगुणाचा पूजक आहे.
सदर कार्यक्रमात वेदमंत्र पठण: हेरंब जोशी गुरुजी प्रास्ताविक: हनुमंत कुलकर्णी संचालन: संजयराव मुठाळसर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी पारनेरकर महाराजांच्या पादुका साईमंदिरात दर्शनासाठी नेण्यात आल्या. याप्रसंगी कमलाकर कोते, जगन्नाथ गोंदकर, मणिलाल पटेल, विनायक रत्नपारखी, आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 साई मंदिर कलशारोहण स्मृतीदिवस सर्व साई भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा दिवस काही वर्षा पासून जाहीर साजरा करण्यात येतो.
पुढील वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने देशभर साई मंदिर कलशारोहन स्मृती दिवस विविध उपक्रमासह साजरा करणार आहोत
सचिन तांबे.
मा विश्वस्त श्रीसाईबाबा संस्थान, शिर्डी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे