आपला जिल्हा

डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोणी येथे प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू 

डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोणी येथे प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू 

डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोणी येथे प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू 

जाहिरात

लोणी विजय कापसे दि २५ जुलै २०२५शालेय जीवना पासूनच आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे हे ओळखूनच पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून लोणी येथे प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्‍यात येणार आहे.

जाहिरात

विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व कळावे व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या भूमिकेतून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालया समोरील सिंधुताई विखे पाटील क्रीडांगणामध्ये हॉलीबॉल, खो-खो, तायक्वांदो व अथलेटिक्स या खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहेत. यामध्ये तज्ञ क्रीडा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ९११२२२३८१५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीमध्‍ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.सुष्मिता विखे पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे