आपला जिल्हा

एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी- डॉ. रवींद्र बुलाखे 

एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी- डॉ. रवींद्र बुलाखे 

एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी- डॉ. रवींद्र बुलाखे 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ जुलै २०२५एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव यांनी SKKU युनिव्हर्सिटी, साउथ कोरिया यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी “संशोधनातील विविध संधी” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेकरिता  डॉ. रवींद्र बुलाखे, SKKU युनिव्हर्सिटी, साऊथ कोरिया  यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

जाहिरात

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की SKKU, युनिव्हर्सिटी ही एस एस जी एम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे खुली करून देत आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ. रवींद्र बुलाखे यांनी त्यांच्या संशोधनाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली तसेच संशोधनाच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सरोदे एम. टी. यांनी आपल्या मनोगतामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सामंजस्य करारा अंतर्गत साऊथ कोरिया येथे उच्च शिक्षण घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली.

जाहिरात

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. विलास गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.  विलास गाडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे आणि प्राध्यापिका प्रियंका पवार यांनी केले. डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. घनश्याम भगत तसेच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे