दक्षिण गोदावरी माता मंदिर उभारणी करीता जागा मिळावी- ढाकणे
दक्षिण गोदावरी माता मंदिर उभारणी करीता जागा मिळावी- ढाकणे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५– कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी दक्षिण गोदावरी माता मंदिर उभारणी करता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांना गुरुवार दि ७ ऑगस्ट २०२५ रोजी निवेदन देत केले आहे.
जाहिरात
ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
कोपरगाव शहरातुन गोदावरी नदी ही पूर्व दक्षिण व पुर्व उत्तर पश्चिम वाहीनी झालेली आहे. तसेच कोपरगावास फार मोठा पौराणिक इतिहास आहे. कोपरगाव बेट भागात जगातील एकमेव दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, संजीवन मंत्र पार, कचेश्वर व त्र्यबंकेश्वर मंदिर, प. पू. जनार्दन स्वामी महाराज, प. पू. रामदासीबाबा यांचे समाधी स्थळ आहे. शहरातील खंडोबा मंदिराकरीता श्री. साईबाबा यांनी तपस्या केलेली तपोभूमी आहे. त्यामुळे २०२७ मध्ये येणाऱ्या कुंभमेळयाचे वेळी याठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गोदावरी नदीच्या कडेला बेट भागात गोदावरी मातेचे मदिराकरीता जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे.जाहिरात
ढाकणे यांनी सदर निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोषदादा काळे, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच तहसिलदार कोपरगाव यांना देखील पाठविली आहे.जाहिरात