आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा पालक मेळावा उत्साहात

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा पालक मेळावा उत्साहात

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-महाविद्यालय संवाद आवश्यक : प्राचार्य डॉ. माधव सरोदे

Kopargaon vijay kapse दि १७ सप्टेंबर २०२६: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

जाहिरात

मेळाव्यात विविध प्राध्यापकांनी पालक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विभाग, विषय तसेच विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य रविंद्र हिंगे, प्रा. प्रज्ञा वर्पे आणि प्रा. माधव रेवगडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी पालक प्रतिनिधी किरण मराठे, प्रीती थोरात, मनीषा ढवळे व एकनाथ संवत्सरकर यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडत मनोगत व्यक्त केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “आजच्या बदलत्या काळात विद्यार्थी-पालक परिसंवादाची गरज अधिक वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखा ही केवळ आर्थिक विचार शिकवणारी शाखा नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करणारी शाखा आहे.”

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख शांतीलाल अग्रवाल यांनी करून दिला. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान ढगे व ज्योती लामखडे यांनी केले, तर आभार सुशील सोनोने यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे