आपला जिल्हा

नगरपालिकेच्या राष्ट्रध्वज विक्री केंद्रास उस्फूर्त प्रतिसाद- उपमुख्यधिकारी पापडीवाल

नगरपालिकेच्या राष्ट्रध्वज विक्री केंद्रास उस्फूर्त प्रतिसाद- उपमुख्यधिकारी पापडीवाल
नगरपालिकेच्या राष्ट्रध्वज विक्री केंद्रास उस्फूर्त प्रतिसाद- उपमुख्यधिकारी पापडीवाल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑगस्ट २०२५भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून याच अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना राष्ट्रध्वज आपल्या घरावर फडकवण्यासाठी उपलब्ध व्हावा या उद्देशाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू केलेल्या झेंडा विक्री स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी प्रत्यक्ष स्टॉलला भेटी प्रसंगी दिली.

जाहिरात
नगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटाच्या महिलांच्या मदतीने माफक दरात सुरू केलेल्या स्टॉलला बुधवार दि १३ ऑगस्ट रोजी उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी दिलेल्या भेटी प्रसंगी पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, नवक्रांती महिला उद्योजक संस्थेचे चंद्रकांत बागुल आदी उपस्थित होते.
जाहिरात
याप्रसंगी उपमुख्यधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी पुढे बोलताना सांगितले की, हर घर तिरंगा मोहीम अतिशय स्तुत्य उपक्रम असून सर्वांनी आपल्या घरावर आपल्या राष्ट्राचा ध्वज फडकवत अंगणात सडा रांगोळी काढत आपला राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत या उपक्रमासाठी परिश्रम घेत असलेले शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव, समृद्धी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा बाळकृष्ण पाटील, सहयोगीनी हेमा तवरेज, बाळकृष्ण महिला बचत गटाच्या अर्चना आगलावे आणि मनिषा बागडे यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे