आपला जिल्हा
एमआयडीसी मध्ये जागा मिळावी यासाठी जास्तीत जास्त उद्योग-व्यवसायिकांनीअर्ज करावे-आ.आशुतोष काळे
एमआयडीसी मध्ये जागा मिळावी यासाठी जास्तीत जास्त उद्योग-व्यवसायिकांनीअर्ज करावे-आ.आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑगस्ट २०२५– कोपरगाव मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आपले नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना उद्योग व्यवसायाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारणार आहेत. भविष्यात कोपरगावमध्ये होणाऱ्या या एम.आय.डी.सी.मध्ये कोपरगाव मतदारसंघातील उद्योजकांचा मोठा सहभाग असावा यासाठी कोपरगाव मतदारसंघातील व्यापारी बांधवांनी व उद्योजकांनी आपले जागा मागणीचे जास्तीत जास्त अर्ज एमआयडीसीकडे दाखल.करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.






