एस.एस.जी.एम. महाविद्यालयात एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा संपन्न
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा संपन्न
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि २० ऑगस्ट २०२५– श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आय.बी.पी.एस., करिअर कट्टा कमिटी, अंतर्गत गुणवत्ता कक्ष तसेच अहिल्यानगर येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन बार्टीच्या समतादूत प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. दिलावर सय्यद यांच्या शुभहस्ते झाले. सदर प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात, “ विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मिळणाऱ्या १५७ मोफत प्रशिक्षणाचा तसेच आर्थिक स्वरूपात मिळणाऱ्या मदतीचा लाभ घ्यावा तसेच कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण अटी व पात्रता निकष विद्यार्थ्यांना व उपस्थितांना समजावून सांगितले.” यावेळी बार्टीच्या समतादूत प्रकल्पातील सहाय्यक श्री. एजाज पिरजादे यांनी, “विद्यार्थ्यांना राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवसाची एकात्मता आणि शांतता प्रसारासाठी शपथ दिली.” कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “महाविद्यालयाने विविध कमिटींच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसाय मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. शासन विद्यार्थ्यांना खूप काही देते आहे ते घेण्याची विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता तयार करायला हवी. विद्यार्थ्यांनी सदैव जागृत असायला हवे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासनाच्या भरतीपूर्व प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष विद्यावेतन यांसारख्या विविध योजनांचा लाभ घेवून जीवनात यश प्राप्त करावे.” असे आवाहन केले.

सदर एकदिवशीय कार्यशाळेचे स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षा केंद्राचे चेअरमन प्रा. चेतन इंगळे यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम भगत, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, महाविद्यालयीन पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. विशाल पवार, करिअर कट्ट्याचे प्रा. किरण पवार, आय.बी.पी.एस.च्या प्रा. डॉ. सीमा दाभाडे, रेल्वे भरतीच्या डॉ.योगिता भिलारे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सुनील काकडे व प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले. तर आभार प्रा डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.




