आपला जिल्हा
सारजाबाई साबळे यांचा उद्या पुण्यानुमोदन तथा जलदान विधी
सारजाबाई साबळे यांचा उद्या पुण्यानुमोदन तथा जलदान विधी
सारजाबाई साबळे यांचा उद्या पुण्यानुमोदन तथा जलदान विधी
कोपरगाव विजय कापसे दि २६ ऑगस्ट २०२५–ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या आई सारजाबाई रामनाथ साबळे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने रविवार दि २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले असून त्यांचा पुण्यानुमोदन तथा जलदान विधी उद्या बुधवार दि २७ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी ९ वाजता बौद्ध संस्कार पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी तालुका कोपरगाव येथे होणार आहे.

सारजाबाई साबळे यांच्या पश्चात मुलगा राजू साबळे, परशराम साबळे, रवींद्र साबळे,अनिल साबळे, मुली इंद्रा जगताप, जनाबाई ससाणे, सुना अनिता राजू साबळे,सुचित्रा परशराम साबळे, वैशाली रवींद्र साबळे, शारदा अनिल साबळे, नातू आकाश राजू साबळे, सुशांत परशराम साबळे, आदित्य रवींद्र साबळे, अंश अनिल साबळे, सागर पोपट ससाणे, आकाश पोपट ससाणे, तेजस भगवान जगताप, नाती मयुरी राजू साबळे, सांची रवींद्र साबळे, सृष्टी अनिल साबळे, जावई भगवान सोना जगताप, पोपट आण्णा ससाने आदी परिवार असून त्यांचा अचानक जाण्याने समस्त साबळे, शेजवळ, नेतकर, केदारे, होले, सैंदाणे आदि परिवारांना दुःख झाले आहे.




