सात्रळ पंचक्रोशीत प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
सात्रळ पंचक्रोशीत प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
कलाकारांच्या सुप्त क्षमतांना वाव देणारा उपक्रम; पदाधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन
सात्रळ पंचक्रोशीतील पंधरा शाळांचा सहभाग
मनोरंजन व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

सात्रळ विजय कापसे दि २७ ऑगस्ट २०२५– नामदार डॉ. राधाकृष्ण ए. विखे पाटील (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर) यांच्या संकल्पनेतून, सालाबादप्रमाणे प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सात्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ, परिसरातील शाळा व महाविद्यालयाचे प्रमुख तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील यांनी दिली.

सदर महोत्सव साजरा करावयाच्या अनुषंगाने सात्रळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ‘सहविचार’ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अण्णासाहेब भा. कडू पाटील, जे. पी. जोर्वेकर, सुभाष नामदेव अंत्रे,इंजिनीयर जोर्वेकर साहेब, वाणी अभिनव शामराव, राजेंद्र खंडू हापसे, राजेंद्र संभाजी खळदकर, मुख्याध्यापक कुटे एस. डी., कानगुडे एच. टी., सांगळे प्रभाकर अण्णा, डॉ. लोखंडे अनिल, पत्रकार अनिल वाघचौरे, सुनील सात्रळकर, सोमनाथ डोळे आदी उपस्थित होते.

‘थिंक ग्लोबली’ ॲक्ट लोकली’, प्रवरा सांस्कृतिक महोत्सवासाठी सात्रळ पंचक्रोशी सज्ज झाली आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. समाज प्रबोधनात्मक संस्कारशील कार्यक्रम, पर्यावरण जागृती, स्वच्छता, महिला सुरक्षा, शिस्त आणि शांततेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे, ही आपल्या सर्व ग्रामस्थांची सामूहिक जबाबदार असल्याचे मत प्रतिपादन संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब कारभारी दिघे पाटील यांनी केले.
सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीचे भान ठेवून प्रवरा संस्कृती महोत्सव दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. या महोत्सवातील कार्यक्रम हे विद्यार्थी केंद्रित असल्याचे मत पाथरे विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आबासाहेब घोलप पाटील यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मोठे सामाजिक व्यासपीठ मिळावे हाच या महोत्सवाचा उद्देश असल्याचे मत ॲड. श्री. पोपटराव वाणी यांनी व्यक्त केले. सालाबादप्रमाणे सात्रळ क्लस्टर मध्ये पंचक्रोशीतील समूहाने, समूहासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा प्रवरा सांस्कृतिक महोत्सव लोकांच्या पसंतीला उतरलेला कार्यक्रम आहे. तरुणाईला विधायक वळण लावणारा, नवोदित कलावंत निर्माण करणारा, सांस्कृतिक करिअरच्या नव्या वाटा दाखवणार हा उपक्रम आपण सर्वजण शिस्तीमध्ये पार पाडूया, असा विचार रमेशशेठ पन्हाळे यांनी व्यक्त केला.
प्रवरा सांस्कृतिक महोत्सव सात्रळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी मंडप व बैठकीची प्रशस्त व्यवस्था राहणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेच्या सहा शाखांचा व इतर नऊ विद्यालयांचा सहभाग राहील. सदरच्या सांस्कृतिक उपक्रमात ४७४ नवोदित विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेणार असल्याची माहिती ‘प्रवरा सिद्धिविनायक गणेश महोत्सव-सात्रळ क्लस्टरचे प्रमुख समन्वयक व छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. के. बी. बारगुजे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मातृपंचकाचा जागर, भारत माता, महिला सबलीकरण, भावगीत, भक्तीगीत,शाहिरी, पोवाडा, पारंपरिक भारतीय लोकगीते आणि प्रयोगरूप लोककलांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी दिली. ‘सात्रळ पंचक्रोशी सहविचार सभे’ चे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. आभार डॉ. संदीप म्हस्के सर यांनी मानले.



