आपला जिल्हा

संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी डिफेन्स क्लस्टरची पाहणी

 संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी डिफेन्स क्लस्टरची पाहणी

संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी डिफेन्स क्लस्टरची पाहणी

जाहिरात

Shirdi vijay kapse दि २३ मे २०२६-शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिर्डीतील या डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकल्पामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला बळ मिळणार असून भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे