आपला जिल्हा

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि ६ सप्टेंबर २०२५शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर या ठिकाणी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.

जाहिरात

या दिवशी पहिल्या टप्प्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिपाई पासून मुख्याध्यापकापर्यंत भूमिका जबाबदारीने उत्तम सांभाळली.कुमारी काळभोर सानिका हिने मुख्याध्यापिका म्हणून आणि कुमारी प्रांजल ससे हिने उपमुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. विद्यार्थी शिक्षक अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

जाहिरात

दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम प्रसंगी ज्यांच्या जयंतीच्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली आणि विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभरामध्ये आलेले अनुभव कथन केले. दिवसभराचे कामकाज उत्तम नियोजन करून शिस्तीत व शांततेत पार पाडल्याबद्दल विद्यार्थी शिक्षकांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ छायाताई काकडे यांनी अभिनंदन व कौतुक केले. मुख्याध्यापक पद हे किती जबाबदारीचे, सर्वसमावेशक व व्यस्त कामकाजाचे असते, याचा अनुभव आल्याचे मत शिक्षक दिन या एका दिवसाच्या विद्यार्थी मुख्याध्यापिका कुमारी सानिका काळभोर हिने व्यक्त केले.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नववीची विद्यार्थिनी गायत्री घालमे हिने केले तर आभार भाग्यश्री झावरे या विद्यार्थिनीने मानले. अध्यापन नियोजनबद्ध होण्याचे कामकाज इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका सुनिता लांडगे व मंगेश कारखिले यांनी पाहिले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता गारुडकर यांनी केले. दिवसभराचे कामकाज यशस्वी पार पाडण्यासाठी निरीक्षक म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंदांनी मोलाचे योगदान दिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे