निवारा व परिसरातील शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान
निवारा व परिसरातील शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान
निवारा व परिसरातील शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५– शिक्षका प्रती असलेली कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी देशाचे माजी राष्ट्रपती तथा शिक्षणतज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी संबंध देशभर मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी व परिसरातील सर्वच कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचा स्व.साखरबाई ओंकाराप्पा कोयटे यांच्या स्मरणार्थ निवारा मित्र मंडळ ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, समता चॅरिटेबल ट्रस्ट व साई निवारा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी श्री पांडुरंग सावली सभागृह कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

समता चॅरिटेबलचे सर्वेसर्वा काकासाहेब कोयटे तथा माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीत गेल्या १५ वर्षापासून हा उपक्रम राबवला जात असून यावर्षी देखील परिसरातील १०० हून अधिक कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान केबीपी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे, एस.एस.जी.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे, सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय ठाणगे, शिवशंकर विद्यामंदिर रवंदेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बिरे, सौ सुशीलामाई काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्करराव काजळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ रमेश सानप, मुख्याध्यापक रमेश मोरे, देविदास झाल्टे, बाळासाहेब गांगुर्डे, मुख्याध्यापिका अनिता धनक आदींच्या शुभहस्ते तसेच विद्या आढाव, शशिकांत जेजुरकर, ज्ञानेश्वर वाकचौरे, मनोज सोनवणे, मनोहर शिंदे, शरद शिंदे, मच्छिंद्र खैरे, मीरा गर्जे दाऊत शेख आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.


शिक्षक हा समाज विकासाचा मुख्य घटक असून त्यामुळे शिक्षकांप्रती फक्त शिक्षक दिनीच आदर व्यक्त न करता वर्षाच्या ३६५ दिवस देखील त्यांचा सन्मान केला तरी त्यांचे ऋण फिटणार नाही.काका कोयटेअध्यक्ष समता चॅरिटेबल ट्रस्ट





