आपला जिल्हा
संजीवनी अकॅडमीच्या समर सैनीची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
संजीवनी अकॅडमीच्या समर सैनीची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

कोपरगांव विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५– दक्षिण भारत विभागीय सीबीएसई क्रिकेट संघ निवड चाचणी स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या समर रघूबीर सैनी याची चौदा वर्षे वयोगटात राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. राहाता येथे संपन्न झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेत तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला. दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण भारत संघातील १८ खेळाडूत सैनीचा समावेश नक्की झाला. या निवड चाचणी स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या अन्य तिन खेळाडूंनी दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कुल्सच्या संचालिका डाॅ.मनाली कोल्हे यांनी दिली.





