डॉ कुणाल घायतडकर यांचे कार्य कौतुकास्पद
डॉ कुणाल घायतडकर यांचे कार्य कौतुकास्पद
प्रभाग नंबर ५ मधील शारदानगर वासीयांकडून विशेष सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५–अत्यंत कमी वयात आपल्या कामाची विशेष छबी जनमाणसात पोहोचवणारे कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.कुणाल अशोकराव घायतडकर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना नविन प्रभागरचना प्रभाग क्रमांक ५ मधील शारदानगरच्या रहिवाशांनी व्यक्त करत त्यांचा विशेष सन्मान करत भावी वाटतीस शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर घायतडकर यांनी कोरोना महामारीत आपल्या जिवाची परवा न करता कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देत अनेक रुग्णांना जीवनदान दिले तसेच आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून २ महिने मोफत दंत तपासणी उपचार व शिबिर तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत मोफत सर्व रोग निदान उपचार व शिबिरे त्यासोबत परिसरात अनेक देशी वृक्षांची लागवड करत त्यांचे संगोपन आदी विधायक उपक्रम राबवत असतात या सर्व कार्याची दखल घेत त्यांचा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव झालेला आहे तसेच शारदानगर येथील सर्व मूलभूत गरजा जसे की रस्ते, पाणी, गटार, पथदिवे, पेव्हर ब्लॉकस, ज्येष्ठ नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी आवश्यक सुविधा आदी विकासात्मक कामांचा पाठपुरावा आमदार आशुतोष यांच्याकडे वारंवार करत शारदानगर चा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे या सर्व कार्याची दखल घेत शारदानगर वासीयांनी डॉ कुणाल यांचा विशेय सन्मान करत कौतुक केले आहे.

या प्रसंगी ह.भ.प आप्पासाहेब शिंदे महाराज ,जितेंद्र शेळके ,अशोकराव लांडगे , संजय कोल्हे ,महेश बाविस्ककर ,संतोष आहेर ,दिग्विजय शेळके ,एकनाथ चव्हाण,आप्पासाहेब मोरे, बाबुराव कुटे ,काका गोर्डे ,यशवंत सर ,सातपुते काका ,कमळाकर पवार ,विनोद घेमुड , साहेबराव जाधव ,नितेश काळे,मनोज लोहाटे,अशोक नरोडे ,सुभाष वैद्य ,अशोक लांडगे, नंदा लांडगे ,बेबी कुटे , डॉ.भाग्यश्री घायतडकर, विटाबाई पवार , संगीता काळे,लक्ष्मीबाई शिंदे ,सुरेखा नरोडे ,मंजिरी घेमूड ,शोभा जाधव ,वैशाली कदम,पार्वती बिडवे ,देव नानी ,शोभा घायतडकर ,प्रतिक्षा घेमुड,नेहा शिंदे ,आशाबाई कासार ,कमल वराडे आदीं शारदा नगरचे महिला पुरुष रहिवाशी उपस्थित होते.
आमदार काळे यांचे व्यक्त केले आभार
प्रभाग नंबर ५ मधील शारदानगर येथे आमदार आशुतोष काळे यांनी
सप्तशृंगी देवी मंदिर समोर हायमॅक्स लाइट तसेच शारदानगर मध्ये नवीन स्ट्रीट लाइट, पोल शिफ्टिंग , नवीन रस्ते मंजूर , ओपन स्पेस करता वॉल कंपाउंड मंजूर करून दिल्या बद्दल तसेच कोपरगाव करांचा अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न ५ नंबर पाणी साठवणूक तळ्याची निर्मिती करत कायमचा सोडविल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे .



